आजचा प्रश्न
प्रश्न- मी ३० वर्षीय अविवाहित असून प्रवासात स्त्रीचा किंवा मुलीचा स्पर्श झाला तर कामवासना उत्तेजित होते व वीर्य पडते. हे चांगले की वाईट?
उत्तर- विरुद्धलिंगी आकर्षण वाढणे, कामवासना वाढून संभोग व त्यामधून अपत्यप्राप्ती ही नैसर्गिक क्रिया स्त्री-पुरुष वयात आल्यावर सर्वांच्यात होत असते.
तुमच्या बाबतीत प्रवासात, गर्दीत दुसऱ्यांच्या शरीराचे घर्षण झाल्यावर कामवासना वाढणे नैसर्गिक आहे. परंतु तुम्ही जाणूनबुजून स्पर्श करत असाल तर ते चुकीचे आहे. हा गुन्हा ठरू शकतो.
वीर्य पडते की पातळ स्त्राव येतो हे नक्की करा. वयात आलेल्या १३ वर्षीय मुलांत न घर्षण करता कामुक चित्रे पाहून वीर्यपतन होऊ शकते. त्याच्या आधी पातळ स्त्राव येत असतो. बरेच पुरुष त्याला वीर्यपतन म्हणतात. काही असो, वीर्यपतन होणे शरीराला घातक नसते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)