आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्री-पुरूष दोघांमध्ये सेक्स इच्छा आहे पण लैंगिक अवयव काम करत नसतील तर त्यांचे कामजीवन कसे?
उत्तर- neurology आणि इतर प्रोब्लेम असेल आणि त्यावर उपचार बिलकुल होत नसेल तर जेवढा शरीराचा भाग कामुक स्पर्शाला प्रतिसाद देतो त्यात सुख घेणे हा मार्ग आहे. कामुक चाळे करणे, एकमेकाला कुरवाळून चुंबन घेणे, आलिंगन, संपूर्ण नग्न शरीराचा स्पर्श यातून आनंद घेणे याला वाव असतो. पण प्रत्यक्ष संभोग हा जननेंद्रियामधील बिघाडामुळे जमणार नाही हे सत्य प्रामाणिकपणे मान्य करावे. नेमके इथे स्त्री-पुरूष सेक्स झालाच पाहिजे हा हट्ट धरून बसले तर मानसिक त्रास ओढवून घेतात. यामुळे जेवढे सुख घेता येते त्यापासूनही दूर जातात. याला मानसोपचार मधील विवेकनिष्ठ उपचार पध्दत वापरावी लागते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)