आजचा प्रश्न

प्रश्न- व्हॅक्यूम थेरपी म्हणजे काय ?
उत्तर- पूर्वी नपुंसकता या समस्येवर उपचार करताना याचा वापर करायचा. व्हॅक्यूम डिवाइस असते त्यात उद्दीपित नसलेले लिंग आत घालून त्या डिवाइसला पुढे हवा भरण्यासाठी पाईप आणि बटण असते, त्याने हवा भरायची. नेगेटिव प्रेशरने लिंगाला ताठरता येते. ती टिकून राहण्यासाठी लिंगाच्या मुळाला रबरी बँड बसवला जातो, ज्यामुळे ताठरता टिकून राहते. डिवाइसमधून लिंग बाहेर काढून सेक्स करता येतो. आता गोळ्या चांगल्या उपलब्ध असल्याने ह्याचा वापर कमी झाला आहे. डिवाइस वापरून उपचार केला जायचा म्हणून व्हॅक्यूम थेरपी म्हणतात एवढेच. आता हेच लोकल स्तरावर तयार केलेले डिवाइस लिंगवर्धक यंत्र म्हणून खपवून लोकांना उल्लू बनवले जाते.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)