आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रीला हस्तमैथुनाचे काय काय फायदे आहेत?
उत्तर- नियमित हस्तमैथुन केल्याने लैंगिक अवयवांचे कार्य चांगले राहते. विवाहपूर्व केल्याने लैंगिक इच्छा, शरीर लैंगिक स्पर्शाला कसे प्रतिसाद देते, शिश्नीका उद्दीपनाने कामपूर्ती कशी मिळते हे समजते. मानसिक समाधान मिळते, झोप शांत लागते, मासिक पाळीमधील नियमितपणा, मासिक पाळीमधील पोटदुखी यात फायदा होतो. कामपूर्ती मिळाल्यास माइग्रेनमधील डोकेदुखी कमी होण्यास मदत होते, त्वचा चांगली राहण्यास मदत होते, स्वतःच्या नग्न शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.