आजचा प्रश्न
प्रश्न- माझे वय २१ वर्षे आहे. मी गेले ५ वर्षे दररोज एकवेळा हस्तमैथुन करतो. त्यामुळे मला काही धोका होईल का?
उत्तर- वयाच्या तेराव्या वर्षापासून वाढलेली वासना शमविण्यासाठी हस्तमैथुन करावे लागते. यात काहीही गैर नाही. तुमच्या लैंगिक भुकेनुसार रोज एक वेळा, दोन वेळा, आठवड्यातून एक वेळा असे हस्तमैथुन होत असते. जवळजवळ सर्वच पुरुष आयुष्यात हस्तमैथुन करतातच. काही ठिकाणी प्रश्नोत्तराच्या नावाखाली या विषयावरच्या जाहिराती प्रकाशित होतात व त्यात हस्तमैथुनावर उपचार सांगितला जातो. ही शुद्ध फसवणूक आहे. यावर विश्वास ठेवू नये. वाढत्या वयात टेस्टेस्टेरॉन संप्रेरक जास्त क्रियाशील असते. त्यामुळे वासना वाढत राहते व कामपूर्तीसाठी हस्तमैथुन केले जाते. यातून तुम्हाला कोणताही धोका नाही, हे लक्षात घ्यावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.