आजचा प्रश्न


प्रश्न- वातावरणातील उकाड्यामुळे शरीरातील उष्णता वाढून कामवासना जास्त वाढते का? वातावरणाचा काही संबंध आहे का ?
उत्तर- असा काही प्रत्यक्ष संबंध नाही. मात्र सरासरी शारीरिक संबंधाचे प्रमाण थंडीमध्ये जास्त वाढते. याचे कारण शरीरातील संप्रेरक नव्हे तर थंडीमुळे पती-पत्नींनी एकमेकांशी जास्त जवळीकपणा साधल्यामुळे कामवासना वाढते व संबंधाचे प्रमाण वाढते तसेच पावसाळ्यातही होते. जास्त जोरात पाऊस पडत असल्याने घरात गार वातावरण निर्माण होते. मग एकत्र आले की कामवासना वाढते. उन्हाळ्यात उकडत असल्याने सैलसर व अंगावर कमी वस्त्रे परिधान केल्याने आकर्षक वाटून शारीरिक संबंध घ्यावासा वाटतो, पण खूप उकडत असेल व घाम येत असेल तर संबंध नकोसाही वाटू शकतो, ही कारणे आहेत.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)


विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.