आजचा प्रश्न

प्रश्न- हस्तमैथुन केलेच नाही तर चालते का?
उत्तर- हस्तमैथुन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात, आपण लैंगिक ताकद गमवून बसू असे वाटते म्हणून मुले, पुरूष असे खूपदा डॉक्टर्सना विचारत असतात. खरेतर हस्तमैथुन हा साथीदार उपलब्ध नसताना वासना शमविण्यासाठी सर्वात निर्धोक मार्ग आहे. तसेच काही उपचारासाठी हस्तमैथुन करण्यास डॉक्टर सल्ला देतात. शीघ्रवीर्यपतन, विलंबित वीर्यपतन, कामपूर्ती कशी मिळवावी, स्वतःच्या शरीरावरील कामुक स्थळे शोधण्यासाठी, वीर्य तपासणीसाठी, प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली असेल तर एवढ्या परिस्थितीत हस्तमैथुन हा उपचार म्हणून करता येते. हस्तमैथुन बिलकुल केले नाहीतर झोपेतून वीर्यपतन होण्याचे प्रमाण वाढेल. लिंगाला स्पर्शच न केल्यानं उलट शीघ्रवीर्यपतनाची समस्या अजून वाढणार. काही डॉक्टर्सच्या मते हस्तमैथुन करण्याचे १०० पेक्षा अधिक फायदे आहेत. ते न करण्यापेक्षा करण्यात जास्त आनंद आहे. त्यामुळे हस्तमैथुनाविषयी गैरसमज न बाळगता त्याबद्दल शास्त्रीय माहिती घ्यावी.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)


विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.