आजचा प्रश्न
प्रश्न- लैंगिक समस्या निर्माण होण्यासाठी कोणती औषधे कारणीभूत आहेत?
उत्तर- ऍलोपॅथीमध्ये विविध असे २० हून अधिक गट (जाती) आहेत की, ज्यामुळे स्त्री-पुरुषांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होतात. त्यामध्ये वेदनायुक्त संभोग, नपुंसकत्व, विलंबित वीर्यपतन, वीर्यपतन बिलकुल न होणे, कामपूर्तीचा अभाव, वासना नसणे, अतिवासना होणे, योनीमार्ग कोरडा पडणे, कामपूर्तीला वेळ लागणे यांचा समावेश आहे. अर्थात यामधील ठराविक गटांचा वापर सतत केला तर दोन महिन्यांनंतर समस्या निर्माण होते तर काही औषधांचा वापर केला तर पुढील १२ तासांतच लैंगिक समस्या निर्माण होते. या सर्वांची अधिक माहिती तज्ज्ञांना भेटून घ्यावी. ऍलोपॅथीव्यतिरिक्त दुसऱ्या पॅथीची औषधे दुष्परिणामविरहित आहेत किंवा सर्व समस्यांवर, लैंगिक समस्यांवर फायदेशीर आहेत, या 'भ्रमात' राहू नये. वरील गटातील औषधांमुळे दुष्परिणाम होतो, ह्यात डॉक्टरांची चूक नसते. त्यामुळे सामान्यांनी डॉक्टरांविषयी गैरसमज करून घेऊ नये. मात्र डॉक्टरांनी औषधांच्या दुष्परिणामांची पूर्वकल्पना पेशंटला द्यावी, हे खरे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)