आजचा प्रश्न

प्रश्न- मधुमेही स्त्रीमधे कोणती लैंगिक समस्या जास्त दिसून येते?
उत्तर- तशी कोणतीही समस्या येऊ शकते. पण रक्तातील वाढलेली साखर अनियंत्रित असली, की योनिमार्गात वारंवार जंतूसंसर्ग, लघवीला जळजळ, योनिमार्गात खाज सुटणे, जखमा होणे असे होते. त्यामुळे वेदनायुक्त सेक्स होतो. वेदनेने नंतर सेक्स नकोसा वाटू लागतो. सेक्स टाळण्याचा प्रयत्न जास्त होऊ लागतो. सेक्समधील ही समस्या पुरूष साथीदाराने समजून घेतली पाहीजे. काहीवेळा याचा विचार न करता तसाच सेक्स करत राहतात. यातून दोघांच्यात वाद, चिडचिड होते. नेमके मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर्स सेक्स लाइफवर बोलत नाहीत आणि हा विषय असाच लपून राहतो. कुठलाही जुनाट आजार सेक्स लाइफवर वाईट परिणाम करतोच. तज्ञ डॉक्टरला भेटून सल्ला उपचार घेणे महत्वाचे.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)