आजचा प्रश्न
प्रश्न- तात्पुरती लैंगिक समस्या कशी ओळखता येईल ?
उत्तर- वासना, ताठरता, योनिमार्गातला ओलावा हे सर्व व्यवस्थित होत आहे आणि अचानक एका सेक्स वेळी ते होत नाही, म्हणजे ताठरता गेली किंवा नीट टिकत नाही. वासना नसते, ओलावा बिलकुल येत नाही तर घाबरण्यासारखे काही नसते. पण हे अनुभव सतत येऊ लागले, तर डॉक्टरी सल्ला अपेक्षित आहे. थोडा प्रॉब्लेम वाटला, तर लोक घाबरून लगेच जाहिराती पाहून उपचार सुरू करतात. इथे फसवणूक होते आणि भोंदू वैद्य ती समस्या अजून गंभीर करून ठेवतो. प्रत्येक सेक्स १००% चांगला झालाच पाहिजे, मला सेक्स समस्या येताच कामा नये असला हट्टीपणा अडचण वाढवतो. एक दिवस नाही झाले चांगले मिलन तर काही हरकत नाही.... चलता है!



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)