आजचा प्रश्न
प्रश्न- मी आदर्श विद्यार्थी आहे. मला समाजात मान-सन्मान आहे. तरी मी लैंगिक संबंध ठेऊ की नको?
उत्तर- लैंगिक संबंध ठेवणे आणि समाजात मान-सन्मान असणे याचा काही संबंध नाही. नैसर्गिक भूक शमवण्यासाठी, आनंदासाठी, दोघांच्या इच्छेने सेक्स करणे यात कमीपणा वा गैर वाटण्याचे कारण नाही. इतर विद्यार्थी सेक्स करतात म्हणून तुम्ही केलेच पाहिजे, असा काही नियम नाही. तुम्हाला पटत असेल तर ठीक, अन्यथा न करणे उत्तम. इतर लोक संबंध ठेवतात म्हणजे त्यांना मान-सन्मान नसतो किंवा ते काहीतरी घाण कृत्य करतात असे समजू नका.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)