आजचा प्रश्न

प्रश्न- शहरी पुरुषांपेक्षा ग्रामीण पुरुषांमध्ये सेक्स जास्त असतो असे म्हणतात. यात किती तथ्य?
उत्तर- असे काही नाही. यापूर्वी आपण पाहिले, की कामजीवन अभ्यास, खाजगीपणा, वेळ मिळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे दोन्हीकडील पुरुषांमध्ये काही ठिकाणी अभाव दिसून येतो. शहरी भागात जास्त वाव मिळतो तसा ग्रामीण भागामध्ये मिळत नाही. शिक्षणस्तर वाढला तर अवांतर वाचन, विचार देवाण-घेवाणमुळे सेक्सची माहिती शहरी स्त्री-पुरुषांमध्ये वाढत चाललीये हे लक्षात येते. शिक्षणस्तर वाढलेला पुरुष परंपरागत काही विचार सोडून नवनवीन विचार मान्य करतो. सेक्स मधल्या विविधता ग्रामीण स्त्री-पुरुष अजून मान्य करायला तयार नसतात. शेवटी काही असो माणसाला जागा, ज्ञान आणि वेळ या गोष्टी असतील तर सेक्स एन्जॉय करता येते. यातील एकाची देखील कमतरता असेल तरी सेक्सला अडचण येते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)