आजचा प्रश्न

प्रश्न- माझी पत्नी प्रेग्नंट राहत नाही कारण माझे वीर्य पातळ आहे. उपाय काय ?
उत्तर- वीर्य पातळ आहे म्हणून बाळ होत नाही असे नसते. शुक्राणूंची संख्या, शुक्राणू चांगल्या प्रतीचे असणे आणि स्त्री देखील निरोगी असणे हे महत्वाचे असते. पेपरमधील जाहिरातींवर विश्वास ठेऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. वीर्य पातळ झाल्याने सेक्स प्रॉब्लेम येतात, बाळ होत नाही असे या जाहिरातींतून पसरवले जाते. स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर यावर उपचार करतात. कोणती लैंगिक समस्या आहे का हे देखील तपासून घ्या. सेक्स बरोबर होत नसेल तरी असे घडते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)