आजचा प्रश्न

प्रश्न- पुरूष लिंगावर तीळ असेल तर त्याला सेक्ससाठी खूप स्त्रिया मिळतात, त्यांचा सेक्स जास्त असतो असे म्हणतात. हे किती खरे आहे ?
उत्तर- ही आरोग्य, शरीराविषयी असलेली अंधश्रद्धा आहे. याला कोणताही आधार नाही. लिंग झाकलेले असताना त्याच्या लिंगावरील तीळ स्त्रीला कसे दिसेल? खूप स्त्रिया मागे लागण्याआधी त्यांना हे कळायला तर हवे ना? तीळ कुठेही असू शकतो. तो ज्या भागी आहे, त्या अवयवाची ताकद वाढते किंवा काहीतरी स्पेशल असते असे नाही. वासना किती आहे हे सम्प्रेरक पातळी, लैंगिक जीवनाकडे कसे बघितले जाते, त्याचा किती अभ्यास आहे, यावर अवलंबून असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)