आजचा प्रश्न
प्रश्न- विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये स्वतःच्या पार्टनर पती/पत्नी सोबत काही लैंगिक समस्या येते का?
उत्तर- विवाहबाह्य सेक्स अनुभवताना जर भावनिक गुंतवणूक जास्त असेल, तर स्वतःच्या साथीदाराबरोबर इच्छा कमी होणे, कामपूर्ती न मिळणे, ताठरता न येणे, योनिमार्ग कोरडा पडणे, दोघांत तुलना करून वाद घालणे असे घडू शकते. पुरुषाला वीर्यपतन लवकर झाले, सेक्स टाळू लागला, तर स्त्रियांना त्या पुरुषाचं बाहेर काही सुरू आहे का, अशी शंका येते. खरे तर प्रत्येकात हेच कारण असते असे नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)