आजचा प्रश्न

प्रश्न- PCOD असल्यावर मूल होत नाही का?
उत्तर- PCOD म्हणजे पोली सिस्टिक ओवारीन डीसीज. स्त्रीमधील संप्रेरक मधील गडबडीमुळे स्त्री बिजामध्ये गाठी तयार होतात. वजन वाढणे, शरीरावर केस जास्त येतात, अनियमित पाळी, पाळीदरम्यान पोटात खूप वेदना होणे, लठ्ठपणा या काही तक्रारी सुरू होतात. यामुळे स्त्री गरोदर राहण्यास वेळ लागतो किंवा वारंवार गर्भपात होतो आणि काही केसमध्ये गर्भधारणा होत नाही. यामागे व्यायामाचा अभाव, जंक फूड्सचे अतिसेवन, व्यसनाधीनता, मानसिक ताण, लठ्ठपणा, काहींमध्ये आनुवंशिकता हे देखील कारण पाहायला मिळाले आहे. ही काही कारणे आहेत. इंन्डोक्रिनोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ यावर योग्य उपचार करतात. उपचारासाठी बऱ्यापैकी वेळ घेणारी ही समस्या आहे. बाळ होत नाही म्हणून पती पत्नी दोघांना मानसिक त्रास होतो. अशावेळी समुपदेशनची गरज असते. उपवास करून काही फरक पडत नाही. सांगितलेला आहार पाळणे, जिद्दीने व्यायाम करून वजन कमी करणे हे काही योग्य पर्याय आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)