आजचा प्रश्न

प्रश्न- मी १९ वर्षीय तरुणी आहे. मला रात्री पॉर्न बघण्याचे व्यसन लागले आहे. रोज रात्री मोबाईलवर पॉर्न विडिओ किंवा फिल्म पाहिली नाही तर मला बेचैनी होऊ लागते. मला या सवयीपासून सुटका करून घ्यायची आहे. उपाय काय?
उत्तर- वयात आल्यावर मुला-मुलींची वासना वाढते. ती शमविण्यासाठी हस्तमैथुन हा योग्य व निर्धोक मार्ग असतो. पूर्वी पोर्नोग्राफी चित्रपट मिळणे तसे अवघड असायचं. आता खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे. मोबाईलवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्नमुळे ते पाहून वाढलेली वासना हस्तमैथुनाद्वारे शमवली जाते आणि याचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे फक्त VCR, कामुक पुस्तकांची जागा पॉर्न व्हिडीओने घेतली आहे. आता मुद्दा आहे पॉर्नच्या व्यसनाचा... पॉर्नचे व्यसन लागलेली व्यक्ती दिवसभर त्यातच इतकी गुंतते, की ज्यामुळे दैनंदिन कामे बाजूला राहतात आणि ते नाही मिळाले की अस्वस्थ होतात. १९ वर्ष वयाच्या मुलामुलींमध्ये वासना असणार हे साहजिक आहे. दररोज कामुक होणे, हस्तमैथुन करणे गैर नाही. फक्त रात्री पॉर्न बघणे आणि नेहमीचे काम कुठंही डिस्टर्ब न करणे याला व्यसन म्हणता येणार नाही.
पॉर्नची चांगली बाजू न सांगितल्याने सध्या उठसुठ लोक 'पॉर्न बघणे म्हणजे आपण व्यसनी झालोच' असे समजतात. व्यसन नीट समजून घ्यायला हवे. पॉर्न अभ्यासकाचा सल्ला अपेक्षीत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)