आजचा प्रश्न

प्रश्न- मुलीचे योनीद्वार लग्नाअगोदर लहान व घट्ट असते आणि लग्नानंतर किंवा मूल झाल्यावर योनीद्वार मोठे व लुज होते का? की एकापेक्षा इतराकंडून सेक्स केल्यामुळे तसे होते ?
उत्तर- सेक्समध्ये अॅक्टिव्ह असलेल्या स्त्रीमधे द्वार मोठे झाले असे प्रत्येकात दिसून येईल असे नाही. हस्तमैथुन करताना काही वस्तूंच्या वापराने द्वार काहीवेळा मोठे झालेले दिसते. नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर योनिद्वारातील स्नायू ढिले पडतात, पण सर्व केसमधे असे पहायला मिळत नाही. जर ढिले पडले, तर पी सी मसलचा व्यायाम करून फायदा होतो किंवा काही स्त्रिया कॉस्मेटिक सर्जरी करतात. पण योनीद्वार ढिले पडले यावरून  स्त्रीने किती वेळा किती पुरुषांशी सेक्स केलेला आहे हे समजत नाही वा तसा अंदाज करता येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)