आजचा प्रश्न
प्रश्न- पुरुषाने एखाद्या एड्स पीडित महिलेशी असुरक्षित संभोग केल्यास त्याला त्याची लागण आणि लक्षणे किती कालावधी नंतर दिसून येतील?
उत्तर- संसर्गानंतर मुखामध्ये किंवा लिंगावर काहीवेळा जखम होते. ताप येतो. पण वारंवार लक्षणे दिसण्यासाठी २ महिने ते ७ वर्षे लागू शकतात. रक्त तपासणी केल्यावर त्यात रिएक्टीव दिसते, ते देखील ठराविक तपासणी केली तरच. लगेचच लक्षणे दिसणे, वारंवार दिसणे हे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, क्षयरोग झालेल्या पेशंटला HIV झाला, तर ती लक्षणे लवकर दिसू लागतील. त्यामुळे लक्षणे दिसण्याची वाट पाहण्यापेक्षा असा असुरक्षित सेक्स झाला असेल, तर डॉक्टरी सल्ल्यानुसार रक्त तपासणी करून घ्यावी.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)