आजचा प्रश्न
प्रश्न- नॉर्मल सेक्स किती वेळ चालावा?
उत्तर- योनीमार्गात लिंग प्रवेश करून वीर्यपतन होण्याचा कालावधी २ ते ५ मिनिटे असतो. परंतु याआधी स्त्रीला कामुक करणे आलिंगन, चुंबन, तिचे कामुक स्थळ उद्दीपित करून शिश्निका उद्दीपित करून कामपूर्ती देणे या क्रिया करून सेक्स करणे या सगळ्याला साधारण १५ ते २५ मिनिटे लागू शकतात. यातले काहीच न करता फक्त योनीमार्गात लिंग प्रवेश करणे हा सेक्स बरोबर नाही. कारण यात स्त्री योनीमार्गात ओलावा येत नाही आणि कामपूर्ती मिळत नाही आणि वेदनायुक्त सेक्स होतो. बऱ्याचदा सेक्स असा होतो असे चित्र आहे, याला सेक्सची माहिती दोघांनी घेणे हा उपाय आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)