आजचा प्रश्न
प्रश्न- संभोगसुख महत्त्वाचे की ब्रह्मचर्य महत्त्वाचे?
उत्तर- संभोगसुख हे फक्त पुढील पिढी निर्माण करण्यासाठी नाही. मानसिक आणि शारीरिक आनंदासाठी संभोग सुख महत्त्वाचे आहे. त्याचे शरीरावर चांगले परिणाम होतात. ब्रह्मचर्य हे "वीर्यनाशाने शरीरातील ताकद जाते" या चुकीच्या, अशास्त्रीय विचारावर आधारित आहे. अशी फसवणूक करून अध्यात्मिक भोंदूगिरी सुरू होते. यात एक पार्टनर ब्रह्मचर्य स्वीकारतो त्यावेळी त्याच्या दुसऱ्या पार्टनरच्या लैंगिक इच्छेचा बऱ्याचदा विचार देखील करत नाही. हा एक प्रकारचा पार्टनरचा मानसिक छळच तो करत असतो. यातून दुसऱ्या पार्टनरला मनोशारीरिक समस्या निर्माण होतात किंवा विवाहबाह्य संबंध, घटस्फोट होतात. दोघांनी एकमेकांना संभोग सुख देणे हे सुंदर आहे. ब्रह्मचर्य हे निसर्गाच्या विरोधात आहे. ब्रह्मचर्यासारख्या वेडगळ कल्पनेला बळी पडू नका.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)