आजचा प्रश्न

प्रश्न- विधवा स्त्री आणि विधुर पुरुष यांनी लैंगिक इच्छेचे काय करावे?
उत्तर- विधवा आणि विधुर होणे हे लग्नानंतर कोणत्याही वयात, कधीही होऊ शकते. प्रत्येकाला लैंगिक इच्छा आहे, तिचे शमन करण्याचा अधिकार आहे, मार्ग आहे. दोन्ही गोष्टीत खरे तर दुसरे लग्न हा पर्याय असतो पण प्रत्येक जण तो मार्ग स्वीकारतो असे नाही. तरी लैंगिक इच्छा निर्माण झाली तर सुरक्षित मार्ग म्हणजे हस्तमैथुन करून ती शमवावी. त्यासाठी कल्पना करणे, कामुक चित्रपट पाहणे, सेक्स टॉयचा वापर करणे, उदाहरण म्हणजे स्त्री साठी डील्डो, व्हायब्रेटर उपलब्ध आहेत. आणि पुरुषासाठी स्त्री बाहुली, कृत्रिम योनी, लिंग उद्दीपनासाठी व्हायब्रेटर वापरणे. आणि आवडत्या मित्र मैत्रिणीसोबत संभोगसुख अनुभवणे. यातले कुठलेही पर्याय विधवा/विधुर निवडतात. ते हे उघडपणे सांगतात, लपून छपून करतात किंवा सांगत नाहीत. नैसर्गिकरित्या वाढलेली वासना शमवण्याचा पूर्ण हक्क त्यांना आहेच. काही वेळा धर्म, संस्कार याचा विचार करून इच्छा दाबून ठेवली जाते. त्याचा फायदा होण्यापेक्षा मानसिक आणि शारीरिक नुकसानच जास्त होत असते. शारीरिक कुठला रोग होणार नाही असे सुरक्षित सेक्स अनुभव घेणे गैर नाही. काही स्त्री पुरुष हे करत आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)