आजचा प्रश्न

प्रश्न- दोन-तीन महिने गर्भनिरोधक न वापरता सेक्स करून देखील गर्भधारणा राहत नाही, तर पहिली कुणाची तपासणी करून घ्यावी ?
उत्तर- असे करून देखील गर्भधारणा राहत नसेल तर बऱ्याचदा स्त्रीमध्ये दोष असेल, असे समजले जाते. पण यामागे नेमके काय कारण असते हे त्यांना माहीत नसते. नेहमी गर्भधारणा नाही झाली की पहिल्यांदा स्त्रीचीच तपासणी करायची असते, असे बिंबवले जाते. त्याचा हा परिणाम. खरे तर पुरुषांच्यामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण आहेच. त्यामुळे अशी वंध्यत्वाची कारणे शोधताना दोघांची तपासणी लगेच करून घ्यावी. एकाच व्यक्तीत वंध्यत्व असेल असे नसते. काहींमध्ये दोघांचाही रिपोर्ट सदोष असतो. असे केल्याने वेळ वाचतो आणि रिपोर्ट्स बघून उपचार ठरवता येतो. यात अजून महत्त्वाचे म्हणजे काही लैंगिक समस्या असणे, हे देखील वंध्यत्वाचे कारण असते. नेमके हे डॉक्टरांच्या काही वेळा लक्षात न आल्याने निदान वा उपचार चुकू शकतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)