आजचा प्रश्न
प्रश्न- एकदा सेक्स केल्यावर दुसरा सेक्स हा अर्ध्या तासाने करावा असे म्हणतात. हे किती खरे?
उत्तर- सेक्सचा नवा अनुभव, नवविवाहित जोडपे, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड, बऱ्याच दिवसांनी भेटणारे जोडपे यात सेक्सचे प्रमाण वाढते. वेळ आणि खाजगी रूम असेल तर दोघांच्या इच्छेने सेक्स पुन्हा पुन्हा होतो. पण एकदा सेक्स झाल्यावर परत करताना अर्ध्या तासानेच करावा असा काय नियम नाही. वयोमानानुसार पुन्हा पुन्हा ताठरता येण्याचा कालावधी वाढत जातो. शिवाय त्याची सेक्समधील आवड, पुढचा पार्टनर सक्रिय आहे का, यावर नंतर किती वेळाने सेक्स होणार हे ठरते. इथे दुसऱ्याच्या सेक्स करण्याशी, त्याच्या प्रमाणाशी तुलना करू नये.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)