आजचा प्रश्न
प्रश्न- एक पुरुषाकडून उद्दीपन, कामपूर्ती समाधानकारक होते मात्र दुसऱ्याकडून होत नाही. असे कसे ?
उत्तर- स्त्रीची त्या पुरुषाबद्दल असलेली ओढ, स्त्रीला उद्दीपित करण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यातली कुठली पद्धत पुरुष वापरतो आणि ती स्त्रीला उपयुक्त आहे की नाही हे व्यक्तीनुसार बदलते, प्रत्येक स्त्रीचे कामुक होणे आणि कामपूर्ती मिळणे यासाठी लागणाऱ्या पद्धती वेगळ्या असतात आणि पुरुषाच्या स्त्रीला कामुक करण्याच्या पद्धती देखील वेगळ्या असतात. शिवाय काय आवडते आणि कसे करायचे हे दोघांनी एकमेकांना सांगावे लागते. ते सगळ्या केसमध्ये होतेच असे नाही. विवाहबाह्य संबंधामध्ये पती व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाला सेक्स मधली विविध तंत्रे माहीत असतीलच असे नाही. अशा वेळी स्त्रीला पती आणि परपुरुष दोन्हीकडून सुख मिळत नाही. ती नाराज झाली की सतत पार्टनर बदलणे असेही होऊ शकते. परत मूळ नियम महत्वाचा ठरतो... "दोघांना सेक्सचा अभ्यास लागतोच आणि दोघांमध्ये याबद्दल संवाद असावा लागतो." असा संवाद घडला तर फारशी अडचण येत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)