आजचा प्रश्न

प्रश्न- वयस्कर स्त्री पुरुषांच्या लैंगिक समस्या सर्व केसेसमध्ये बऱ्या होतात का?
उत्तर- वयानुसार शरीरात बदल होत असतात, त्यामुळे होणाऱ्या लैंगिक अवयवांमधील बदल, क्रिया यामध्ये व्यक्तीनुसार फरक पडत असतो. त्यात काही जुनाट आजार त्याचा परिणाम होत असतो. तो मान्य करावा. तरी त्यात नपुंसकत्व, शीघ्रपतन यावर चांगला उपचार उपलब्ध आहे. त्याचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. याबरोबरच दुसऱ्या लैंगिक समस्येवर देखील पार्टनरची साथ लागते. लैंगिक जीवनाकडे बघण्याचा दोघांचा दृष्टीकोन कसा आहे, खाजगी रूम असणे, एकमेकांना मदत करण्याची तयारी असणे, यावर उपचाराची यशस्विता ठरते. पण काहीच फरक पडणार नाही असे नाही. काही गंभीर केस मध्ये fantasy, शरीर कुरवाळणे, कामुक चित्रपट पाहणे यातून आनंद मिळवता येतो. अशा केसमध्ये समुपदेशन फार गरजेचे असते, कारण लिंग प्रवेश करणे हाच खरा सेक्स असा हट्ट करणारे कायम निराशच राहतात. उपचाराला वेळ लागतो. मलम, तेल यांनी काही फायदा नसतो. निव्वळ फसवणूक होते. उपचाराला स्त्री तयार नसेल तर असे उपचार करण्याकडे कल जास्त असतो. परस्पर तेल, मलम लावून बरे होईल असे समजून पैसे वाया घालवतात. यात स्त्री पुरुष चिडचिडे बनतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)