आजचा प्रश्न

प्रश्न- कोरोनामधून बरे झाले की कोणत्या लैंगिक समस्या येतात? की काहीच समस्या येत नाहीत?
उत्तर- लोकांना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या बघून भीती असते. मन अस्वस्थ होते, आजार आणि उपचार यातून शरीरात आलेला थकवा यातून पूर्ण बाहेर आल्यावर लैंगिक सुख घेण्यास हरकत नाही. पण तरी देखील कोरोना संसर्ग होण्याची भीती काही लोकांत अजून असते, अशा वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्याने जावे. स्त्री-पुरूषामध्ये लैंगिक इच्छा नसणे ही समस्या येते. पुरुषांमध्ये लिंग कडकपणा कमी होणे ही समस्या येते. यावर उपचार म्हणून तेल, मलम तसेच पेपरमधील जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. कोरोनातून बरे झाल्यावर कायमस्वरूपी अशी कोणतीही लैंगिक समस्या येत नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)