आजचा प्रश्न
प्रश्न- काही वेळा अपंग व्यक्ती बरोबर अपंगत्व नसलेली व्यक्ती लग्न करते. त्यांचा सेक्स कसा होतो?
उत्तर- प्रेम असलेल्या व्यक्तीकडे प्रत्येक वेळा प्रत्येक जण सेक्सला प्राधान्य देऊनच पाहतो असे नाही. एखाद्याला त्याची बुद्धी, स्वभाव हे गुण आवडलेले असतात. त्यामुळे सेक्सला दुय्यम स्थान दिले जाते. तो त्यांचा निर्णय असतो. तरी त्यांच्यात सेक्स होत असताना काही विशिष्ट सेक्स आसनाचा वापर करता येतो. म्हणजेच त्यांच्यात सेक्स आसनांना मर्यादा येतात. अपंगत्व किती प्रमाणात, शरीराच्या कोणत्या भागाला अडचण आहे, त्यावर आसन ठरणार.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)