आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्री-पुरुषांच्या कोणत्या लैंगिक समस्यांवर लगेच तपासणी करावी लागते?
उत्तर- खरे तर बऱ्याच समस्येवर लगेच विविध प्रकारच्या तपासण्या कराव्या लागत नाहीत. काय होत आहे हे जेव्हा पेशंट सांगतो, तेव्हा त्याचे मूळ कारण शोधून काढताना केस टेकिंग महत्त्वाचे असते. त्यावरून समस्या मानसिक की शारीरिक हे समजते. ताठरता कमी आली असेल तर लगेच प्रत्येक वेळा रक्त तपासणी, सोनोग्राफी याची गरज नसते. तसेच स्त्रीची इच्छा कमी, वेदनायुक्त संभोग होत असेल तर लगेच संप्रेरके, रक्त तपासणीची गरज नसते. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, व्यसनाधीन अशा केसेसमध्ये तपासणी करावी लागते, तसेच अपघातात जननेंद्रियांना इजा झाली असेल तर सर्जन, मूत्ररोग तज्ञ हे उपचार करतात. यात काही वेळा स्कॅनिंग करावे लागते. निव्वळ लैंगिक अवयवाबद्दल शंका, गैरसमज असेल तर शारीरिक तपासणी आवश्यक असते. माल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स पेशंटकडून पैसे उकळण्यासाठी भरमसाठ तपासणी करण्यासाठी सुचवू शकतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)