आजचा प्रश्न

प्रश्न- थंडीच्या दिवसांत महिलांची गर्भवती होण्याची शक्यता गरमीच्या तुलनेत वाढते. हे खरं आहे का?
उत्तर- तसे सगळ्या ऋतूत हे दिसून येईल. देशानुसार आणि तिथल्या वातावरणामुळे कधी प्रेग्नन्सी प्लॅन करायची ते पती-पत्नी ठरवतात. काहींना हिवाळ्यामध्ये बाळ जन्माला यावे असे वाटते. त्यामुळे त्याच्या ९ महिने आधी ते प्लॅन करतात. लग्नाचा हंगाम भारतात असतो त्याच्या पुढील १ ते ५ महिन्यात प्रेग्नन्सी वाढल्या, असेही दिसून आले आहे. तसे इतर देशात वेगळे दिसते. निसर्गानुसार सगळ्या ऋतूंमध्ये स्त्री गरोदर राहतेच. खास एखाद्या ऋतूतच जास्त असे म्हणता येणार नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)