आजचा प्रश्न
प्रश्न- कोड असलेल्या व्यक्ती बरोबर सेक्स केल्यास तो निरोगी व्यक्तीत पसरतो का?
उत्तर- कोड हा संसर्गजन्य नाही. एक घटक कमी असल्याने फक्त पांढऱ्या रंगाचा चट्टा किंवा शरीरावर ठीक-ठिकाणी पांढऱ्या रंगाची त्वचा होते, याचा सेक्सवर कोणताही परिणाम होत नाही. परंतु समाजात वावरताना कोड असलेल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते आणि याचा दबाव घेऊन कोणी जगत असेल तर सेक्स करताना नग्न होण्यास लाजणे, लग्न न ठरणे, तात्पुरती लैंगिक समस्या येणे असे होऊ शकते. खरंतर कोड आहे म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)