आजचा प्रश्न

प्रश्न- पुरुषांच्या लैंगिक अवयवामधील आजार हा पत्नीला लगेच कसा कळत नाही? एक दोन वर्षांनी घटस्फोट मागतात. हे काहीतरी खोटे वाटते? 

उत्तर- सेक्स लाइफ बद्दल मुळातच बोलले जात नाही किंवा बोलले तरी वरवरचे बोलणे होत असते. अंधारात सेक्स केला जातो. नॉर्मल आणि अबनॉर्मल हे माहीत नसते. सेक्स करताना डोळे झाकून घेतल्याने प्रत्यक्ष शरीर कसे असते हे लक्षत येत नाही. यामुळे स्त्रीला पतीची लिंग रचना कळायला वेळ जातो. काहीही असो घटस्फोट होण्याआधी जर लैंगिक समस्या, गैरसमज असतील तर घटस्फोट100%वाचवता येतो. गरज आहे योग्य माहिती घेण्याची. लिंग लहान असणे, पेरोनिस डिसीज, मूत्रमार्ग समोरुन न उघडता दुसरीकडून उघडणे, वृषण ग्रंथी नसणे, लिंगाला काही आजार असणे या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. अशा केसेस मी पाहिल्या आहेत. 



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)