आजचा प्रश्न

प्रश्न- शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी वा जास्त असणे हे आनुवंशिक असते का ? 

उत्तर- लिंग आकार, स्तन आकार हे आनुवंशिक असतात. पण विर्यामधील शुक्राणू संख्या यामागे आनुवंशिक कारण नसते. व्यसनाधीनता, लठ्ठपणा, अति गरम हवामानात काम करणे, संप्रेरकांधील काही आजार, वृषणग्रंथीमधील स्थानिक आजार, वृषणग्रंथी ते मूत्रनलिका मधील अडथळा, अशा कारणांमुळे शुक्राणू संख्या कमी होते. इथे लक्षात घ्यावे की हस्तमैथुन, सेक्स, झोपेतले विर्यपतन याच्या अति प्रमाणामुळे शुक्राणू मध्ये दोष निर्माण होत नाही. शुक्राणू वाढवतो, वीर्य घट्ट करतो अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)