आजचा प्रश्न
प्रश्न- लिंगाला रात्रभर ताठरता येण्यास दूध आणि काही घरगुती खाद्य youtube वर सांगितले जाते. ते कितपत खरे असते ?
उत्तर- लैंगिक जीवनातला अतिशयोक्त भाग पुरुषांना पाहिजे असतो. बरोबर तोच भाग दाखवला जातो. हे दिशाभूल करणे, फसवणे यासाठी मस्त असते. रात्रभर ताठरता राहणे हे अभिमान बाळगण्यासारखे नसून तासंतास ताठ लिंग हे नॉर्मल नसून हा प्रॉब्लेम असतो. याला 'प्रायापिसम' म्हणतात. जर अशी ताठरता कमी केली नाही, तर नपुंसकत्व येते. असले घरगुती उपाय सांगून हे लोक लोकांच्या मनात चुकीच्या अपेक्षा अजून वाढवतात. गरज आहे शास्त्रीय माहिती देण्याची. शिवाय youtube वर काय अपलोड करावे याला बंधन नाही. सेक्स विषयक प्रचंड गैरसमज पसरवण्याचे काम यावर दिसून येते. आपण विवेक न गमावणे हे महत्वाचे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)