आजचा प्रश्न

प्रश्न- मुलीबरोबर बोलताना लिंगातून स्त्राव का येतो ?
उत्तर- आवडत्या मुलीबरोबर फोनवर/समोर बोलताना, काही मुलांना इच्छा वाढते आणि ओलसर नैसर्गिक वंगण तयार होते. हे वीर्यपतन होण्याआधी सर्वांमधे होत असते. यात काही आजार नसतो. त्यालाच वीर्यपतन झाले असे काही मुले समजतात. पण ते वीर्यपतन नसून वंगण असते. हा कॉवपर्स ग्रंथीचा स्त्राव असतो .त्यानंतर लगेच लघवी केली तर मुलांना वाटू लागते की लघवीतून विर्य पडते. परंतु हे या ग्रंथीचा स्त्राव लिंगातून लघवीबरोबर बाहेर येतो. याने अशक्तपणा वगैरे काही येत नसतो. याच आशयाच्या जाहिराती असतात. 'लघवीतून धातू जातो उपचार घ्या' या जाहिराती खोट्या असतात. त्यावर विश्वास ठेवू नका.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)