आजचा प्रश्न
प्रश्न- विना अपत्य जोडप्यांना कामजीवन अनुभवता येते का?
उत्तर- संप्रेरके नॉर्मल असतील आणि आपण पालक होऊ शकत नाही, हे फार मनावर घेतले नसेल, तर अशी जोडपी देखील सेक्स लाइफ चांगले अनुभवू शकतात. पण नातेवाईकांचा, समाजाचा दबाव आणि संप्रेरकांमधील दोष यामुळे दोघांमधे वासना कमी होणे, नपुंसकता, वीर्यपतन न होणे, सेक्स करताना दडपण येणे अशा समस्या येतात. हे तज्ञ डॉक्टर्सना भेटून व्यवस्थित करता येते. या देशात स्वतःसाठी जगण्यापेक्षा 'लोक काय म्हणतील' याचा दबाव घेऊन जगणारे लोक जास्त आहेत. याच आधारावर अम्मा, बापू, पप्पू, ज्योतिषी हे बरोबर लोकांना फसवतात. त्यांच्यापासून सावध व्हावे. निव्वळ आईबाप होऊ शकत नाही, हा आयुष्याचा एकच महत्वाचा भाग असू शकत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)