आजचा प्रश्न

प्रश्न- सर्वात जास्त वेळा पहायला मिळणारी लैंगिक समस्या कोणती ?
उत्तर- नपुंसकता ही समस्या बऱ्याच वेळा पहायला मिळते, असे आपल्याला वर वर वाटते, पण हस्तमैथुन, लिंगाकार या विषयीची भीती असणे ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावत आहे. याला लैंगिक शिक्षण हाच उपचार आहे. हे न दिल्याने भितीमुळे होणाऱ्या लैंगिक समस्यात वाढ होणार आणि त्याचा गैरफायदा पेपरमधील, इंटरनेटवरील जाहिराती घेणार आणि आता घेत आहेत. घरात बसून सगळा ऑनलाईन उपचार होतो असे समजून गोळ्या, तेल, मलम यात पैसा वाया जातो. समाजाने विवेक केव्हाच गुंडाळून ठेवलाय. इंटरनेटच्या मायाजालात अडकून वैद्यकीय सेवा पण ऑनलाईन हवी असा तरुणांचा हट्ट एक दिवस त्यांनाच अडचणीत आणणार हे नक्की.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)