आजचा प्रश्न

प्रश्न- स्वप्नदोष महिन्यात किती वेळा झाला म्हणजे नॉर्मल असते? 

उत्तर- पहिले म्हणजे स्वप्नदोष हा शब्द चुकीचा आहे. 'झोपेतले विर्यपतन' असे म्हणूयात. वयात आल्यावर वाढलेली वासना शमविण्यासाठी सेक्स, हस्तमैथुन, झोपेतले विर्यपतन या पद्धती आहेत. तीनही नॉर्मल आहेत. प्रत्येकाला सेक्स करणे जमत नाही तर हस्तमैथुन केले जाते. काही कारणास्तव हस्तमैथुन केले गेले नाही तर रात्री झोपेत विर्यपतन होत असते. नियमित सेक्स, हस्तमैथुन केले तर झोपेत वीर्यपतन शक्यतो होत नाही. आणि तसे झाले तरी काही बिघडत नाही. यासंबंधीच्या पेपर मधील एकाही जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. झोपेतल्या वीर्यपतनामुळे अशक्तपणा येत नसतो. तसे होते असे वाटणे ही मानसिक समस्या असून त्यावर लैंगिक शिक्षण हा उपाय आहे. गोळ्या नव्हे. 



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)