आजचा प्रश्न
प्रश्न- मी २९ वर्षीय तरुण आहे. माझे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन झाले आहे. नुकताच माझा विवाह झाला आहे. अशा स्थितीत सेक्स केल्याने माझ्या तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाही ना ? 
उत्तर- शस्त्रक्रिया झाल्यावर शरीर पूर्ववत होण्यास काही कालावधी तर जावा लागतोच. तो कोणती आणि आणि कुठल्या भागाची शस्त्रक्रिया केली त्यावर अवलंबून आहे. किडनीची शस्त्रक्रिया झाली तर सेक्स करताना पोटाला जर ताण पडत नसेल आणि शस्त्रक्रियेनंतर सर्व जखम बरी झाली असेल तर सेक्स करण्यास हरकत नाही. पोटावर अजून ताण पडत असेल पण सेक्स हवा आहे तर स्त्रीने सेक्समध्ये सक्रिय झाले पाहिजे, नाहीतर परहस्तमैथुन, मुखमैथुन, स्त्री वर येऊन सेक्स करू शकते. यातील कोणताही पर्याय आहेच. तरी देखील योग्य डॉक्टरी सल्ला हवाच.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)