आजचा प्रश्न
प्रश्न- एच.आय.व्ही. बाधा होण्याची ज्यांना सहज शक्यता असते त्या व्यक्ती कोणत्या ?
उत्तर- या गटाला 'हाय रिस्क ग्रुप' असे म्हणतात. हा आजार तसा वैयक्तिक वर्तनाशी संबंधित आहे. दूषित लैंगिक संबंध ठेवणारी कोणतीही व्यक्ती यात येते. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी दूषित लैंगिक संबंध करणाऱ्या व्यक्ती, गर्भवतीला एच.आय.व्ही. संसर्ग झाला असल्यास तिला होणाऱ्या बाळाला धोका असतो, एच.आय.व्ही. ग्रस्त व्यक्तीने वापरलेल्या दूषित सुईने मादक द्रव्ये घेणाऱ्या व्यक्ती, समलिंगी दूषित लैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती, वेश्या, कॉलगर्ल, पुरुषवेश्या यांच्यामध्ये एच.आय.व्ही. संसर्गाची शक्यता खूप असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)