आजचा प्रश्न
प्रश्न- मी तीस वर्षीय नवविवाहित आहे. लग्नापूर्वी मी हस्तमैथुन करायचो. त्यामुळे माझे लिंग व वृषणग्रंथी बारीक झाल्या आहेत. काय उपाय ?
उत्तर- लिंग व वृषणग्रंथी याचा आकार हस्तमैथुनाने कमी होत नाही किंवा वाढतही नाही. थंडी व उष्णता या हवामानातील बदलामुळे लिंग व वृषणग्रंथीची ठेवण सारखी बदलत राहते. थंडीत बारीक होते व उष्णतेत त्याची लांबी थोडी मोठी होते. हे दोन्ही बदल कायमस्वरूपी नसतात. शरीराचा कोणताही अवयव वापरत राहिल्यास बारीक होत नसतो. जननेंद्रियाला काहीही झाले, संभोगात कोणतीही समस्या आली तर प्रत्येक पुरुष त्याचा संबंध प्रत्येकवेळी हस्तमैथुनाशी लावतो. त्याला फसवायला 'हस्तमैथुनानेच सर्व घडते' असे खोटे चित्र जाहिरातीतून दाखवले जाते.
वरील समस्येवर तज्ञांकडून लिंग व वृषणग्रंथीची तपासणी करून खात्री करून घ्यावी.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)