आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्रियांमधील कामउदासीनता ही कमी प्रमाणात आहे की अधिक आहे? मग पती-पत्नी वैवाहिक आयुष्यात सुखी कसे ?
उत्तर- प्राथमिक किंवा द्वितीयक असे कामउदासीनतेचे दोन प्रकार आहेत. लग्नापूर्वीच स्त्रीमध्ये कामवासना कमी असणे, बिलकुल नसणे हे प्राथमिक व लग्नापूर्वी चांगली होती परंतु लग्नानंतर कामभावना कमी होते, हे द्वितीयक. मानसिक व शारीरिक कारणांत ही समस्या स्त्रियांत खूप आहे. पतीपत्नींचा संसार वरवर चांगला चाललेला दिसतो, यावरून समाज असे मानतो की सर्व सुरळीत चालले आहे. प्रत्यक्षात घडते असे..... पती-पत्नींना माहीत नसते ह्या समस्यांवर कोणत्या डॉक्टरांकडे जायचे. 'सेक्स' मध्ये फारसा इंटरेस्ट नसणे, पत्नीचा सहभाग मिळाला नाही तरी बळजबरीने संभोग करणे (विवाहांतर्गत बलात्कार) होतो.
याउलट ज्यांना यातून बाहेर पडावे असे वाटते ते तज्ज्ञांचा सल्ला घेतात. तसेच संभोग करताना पत्नीचा जरासुद्धा नकार नसतो, ती काहीच बोलत नाही, याचा पुरुष अर्थ काढतात की, 'आपण सर्व व्यवस्थित करतोय. बायको खुश आहे.' वैवाहिक आयुष्यातील कामजीवनात सर्वात मोठी चूक पती-पत्नी करतात. ती म्हणजे एकमेकांमध्ये या विषयावर 'चर्चाच' करत नाहीत.
कामजीवनात अशा नाखुष असणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, हे कटू सत्य आहे. फक्त मूग गिळून गप्प बसणारे बरेच आहेत. त्यांनी बोलते व्हावे. त्यामुळे भारतात कामजीवनातील एखाद्या चांगल्या क्रियेलादेखील 'वाईट' म्हणून शिक्का मारला जातो. खऱ्या आनंदापासून अलिप्त राहतात. शास्त्रीय माहिती घेतल्यास सुखप्राप्ती निश्चित असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)