आजचा प्रश्न
प्रश्न- गरोदर स्त्रीची प्रसुती कधी होईल हे कसे ओळखतात ?
उत्तर- गरोदर स्त्रीच्या शेवटच्या पाळीची तारीख लक्षात घेऊन त्या दिवसापासून ९ महिने व ७ दिवस मोजले जातात व येणारी तारीख ही प्रसुतीची तारीख समजली जाते. तरीही त्याच दिवशी प्रसुती होईल असे नाही. पुढे-मागे ५ ते ७ दिवस जाऊ शकतात. या तपासणीला Expected Date of Delivery (E.D.D.) म्हणतात.
उदा. एखाद्या स्त्रीची शेवटची मासिक पाळी ९ जुलैला आली असेल, ती गरोदर झाली असेल तर तिची प्रसुती १५ एप्रिल ही येते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)