आजचा प्रश्न
प्रश्न- सीमेन बँक काय असते ?
उत्तर- यामधे पुरुषांचे वीर्य हे विशिष्ट तापमानात साठवून ठेवले जाते. पोल्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनपेक्षितपणे हा शोध लागला. १९४९ मधे हे सुरू झाले. १९५३ साली अशाप्रकारे फ्रोजेन केलेल्या सिमेनमधून गरोदर झालेली केस आहे. मुम्बई मधे १९८८ साली पहिली सीमेन बँक सुरू झाली.
sperm डोनर चे semen (वीर्य) गोळा करून साठवून ठेवण्यासाठी याचा वापर असला तरी स्वतःच्या पतीचे वीर्य देखील साठवता येते. त्याची कारणे...पती बऱ्याच वेळा नोकरी, व्यवसायामुळे परदेशी जात असेल आणि पत्नीबरोबर सेक्स होत नसेल, पतीला कोणती मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असेल तर त्या आधीच वीर्य साठवून ठेवण्यात येते, पत्नी मधील वंध्यत्वावर उपचार सुरू आहे पण बराच कालावधी लागणार असेल तर पतीच्या वयामुळे अडचण येऊ नये म्हणून आधीच वीर्य साठवून ठेवता येते.
अशा बँका भारतात मोठ्या शहरामधे आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)