आजचा प्रश्न

प्रश्न- इमर्जन्सी पिल्सचा वापर करून विवाहपूर्व/विवाहबाह्य संबंध खूप वाढतील. त्यामुळे अशी जाहिरात करणे, माहिती देणे चुकीचे नाही का ?
उत्तर-  या पिल्स नव्हत्या त्यावेळी विवाहपूर्व/विवाहबाह्य संबंध होतच नव्हते असे नाही. जगात सर्वत्र हे संबंध चालत होते, आहेत व राहणारच. फक्त यातून जी मुलं जन्माला येतात ती येऊ नयेत म्हणून या पिल्सचा वापर होणार आहे. शिवाय, पती-पत्नींना दुसरे मूल नको आहे तेव्हादेखील हे वापरता येणारच आहे, म्हणजे जर लग्नाआधी मूल झाले तर त्याचा खून केला जातो किंवा अर्भक रस्त्यावर टाकले जाते, हे प्रकार तरी थांबतील किंवा कमी होतील. त्यामुळे जाहिरातीतून अशा औषधांची माहिती समाजापर्यंत जाणे आवश्यक आहे.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)