आजचा प्रश्न
प्रश्न- मोठ्या स्तनांमधे खूप दूधनिर्मिती होते का ?
उत्तर- स्तन हे चरबीचे गोळे असतात. त्या पूर्ण स्तनात दूध तयार होत नसून nipple (स्तनाग्र) च्या आतील बाजूस भोवती द्राक्षाच्या घडाप्रमाणे पेशी असतात. बाळंतपणामधे दुधनिर्मिती होते. बाळ जितके चूशन करेल तितके दूध येते. मानसिक त्रास, आजारपण यात दूध कमी येते. काहींमधे स्तन आकार तसाच मोठा राहतो तर काहींमध्ये तो काही काळाने कमी येतो. दुधनिर्मितीचे प्रमाण स्तनांच्या आकारावर अवलंबून नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)