आजचा प्रश्न
प्रश्न- मी ३३ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझे लैंगिक जीवन व्यवस्थित आहे. तरी देखील मला स्वप्नदोष कसा होतो ? हा आजार आहे का ?
उत्तर- झोपेमध्ये कामूक स्वप्न पाहून वीर्यपतन होणे या क्रियेला स्वप्नदोष म्हणतात. वास्तविक हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. याला स्वप्नावस्था हा योग्य शब्द आहे. वयाच्या साडे तेरा वर्षांपासून वीर्याची उत्पत्ती सुरु झाली की अगदी मृत्यूपर्यंत ही नैसर्गिक क्रिया पुरुषांमध्ये  सुरु असते. शारीरिक संबंध नियमित असून देखील झोपेत वीर्यस्खलन होऊ शकते. पत्नीची संभोगास तयारी नसणे, पत्नीची संभोगास इच्छा नसणे, पत्नी बरेच दिवस आजारी असणे, गरोदर असणे या कारणांनी जर प्रत्यक्ष संभोग क्रिया न घडल्याने पुरुषाची वाढलेली कामवासना झोपेत स्वप्न पडून वीर्यस्खलन होते व कामवासना कमी होते. यात काहीही घाबरण्यासारखे नाही. हा कोणताही आजार तर नाहीच नाही.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)