आजचा प्रश्न
प्रश्न- झोपेची तक्रार असणाऱ्यांमध्ये कामवासनेवर परिणाम होतो का ?
उत्तर- एकूण चोवीस तासांपैकी रात्रीच्या सात-आठ तास प्रत्येकाला विश्रांतीची गरज असते. 'इनसोमनिया' या तक्रारीत त्या व्यक्तीला झोप लागत नसते किंवा पहाटे दोन-तीन वाजता झोप येते. अशावेळी समोर त्याचा वैवाहिक साथीदार जरी असला तरी विश्रांती न मिळाल्याने त्याची कामवासना कमी होते व तो प्रत्यक्ष संभोगात रममाण होऊ शकत नाही. शिवाय अंगात मरगळ असल्याने लिंग ताठरतेवर काहीसा परिणाम होऊ शकतो. झोपेच्या तक्रारी येण्याच्या कारणांमध्ये व्यसनांच्या आहारी जाणे, रात्री बराच वेळ व्यवसाय, नोकरी निमित्ताने बाहेर राहणे, मानसिक त्रास ही कारणे आहेत. झोप व्यवस्थित झाली, अपेक्षित विश्रांती मिळाल्यानंतर दिवसात फावल्या वेळेत शारीरिक संबंध होऊ शकतो. रात्रीच संभोगसुख घ्यावे असा नियम नाही.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)