आजचा प्रश्न
प्रश्न- पुरुषांची सुंता केली जाते तसेच स्त्रियांचीही सुंता केली जाते, यात कितपत तथ्य आहे ?
उत्तर- हो सत्य आहे. त्याला फीमेल जेनिटल म्युटिलेशन (FGM) म्हणतात. फीमेल जेनिटल कटिंग असाही शब्द वापरला जातो. आपल्याकडे खताना म्हणतात ते हेच. वयाच्या ६-१५ वर्षामध्ये हे केले जाते. या मध्ये तिची शिश्निका, योनीच्या लहान पाकळ्या (भगोश्ट) हे भाग कापले जातात. तिची लैंगिकता कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी हे केले जाते. मूत्रद्वार आणि योनिचा सेक्स करण्यास आवश्यक तेवढा भाग उघडा ठेवला जातो. हे साध्या ब्लेडने कापले जाते आणि कापणारी स्त्री ही नर्स किंवा डॉक्टर नसते. योनीला जंतु संसर्ग होतो, प्रचंड वेदना, मूत्रमार्गाला संसर्ग होते. या स्त्रियांना डिलिवरी मध्ये काही अडचणी येतात.
आफ्रिकन, आशिया, सुदान देशात हे प्रकार होतात. जवळजवळ २७ आफ्रिकन देशात ही रीत आहे. भारत देशात पण बोहरा समाजमध्ये हे प्रकार चोरी छुपे सुरू आहेत. विशेष म्हणजे मुम्बई मध्ये देखील. जगभर ही पद्धत थांबावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)