आजचा प्रश्न

प्रश्न- स्त्रीने पतीच्या लैंगिक अवयवाची विकृती कशी ओळखावी ?
उत्तर- शाळेत 'माय बॉडी' या धड्यामधे चड्डी घातलेली लहान मुलगा, मुलगी दाखवली जाते. अशा समाजात मुले चोरून ही माहिती दुसरीकडून घेतात. काहीवेळा ही खरी असते तर काहीवेळा माहिती खोटी मिळते. खरे तर ही सर्व माहिती लैंगिक शिक्षणामधे द्यावी. पण तसे होत नाही. विवाहपूर्व मार्गदर्शनामधे पण अशी माहिती सर्व डॉक्टर्स देत नाहीत. त्यामुळे तज्ञ डॉक्टरकडून पुरुष लिंगाचे आकारातील वेगळेपणा, आकार कसा मोजावा, विकृती हे दाखवावे लागतात. सेक्स उजेडात करताना किंवा एकत्र स्नान करताना लिंग स्पष्ट दिसते. येथे लाजण्याचा प्रकार होत असेल तर स्त्रीला शेवट पर्यंत कळत नाही किंवा फार उशीरा कळते. लिंग लहान, वाकडे, मोठे, वृषणग्रंथींमधील आजार, वृषण एकच असणे किंवा दोन्ही नसणे, लिंगाला मूत्रद्वार नसणे अशा विकृती हे आधीच भावी पत्नीला माहीत असायला पाहिजे. अगदी असंच पुरुषाला स्त्री विषयक विकृती माहित असावी.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)